


प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट
धामनधरी ग्राम पंचायत कार्यालय येथे सेवक पदावर कार्यरत असणारे गजानन कांबळे यांचे 16 महीनीचे वेतन गजानन कांबळे यांना न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्राम पंचायत कर्मचारी संघटना नोंदणी क्रमांक 682 शाखा तालुका किनवट यांना कळवले असता
संघटनेने वेतनाची चौकशी केली असता सदरिल खाते क्रमांक AC. 80050647677 हे खाते
आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक BM श्रीनिवास शंकर दारलावार राहणार दहेली यांचे असल्याची माहिती महाराष्ट्र ग्रामीण बैंक चे अधिकारी यांनी दिली
गजानन कांबळे यांच्या सोबत किनवट तालुक्यातील अनैक ग्राम पंचायत कार्यालयीन कर्मचारी यांचे वेतन पत्रावरिल अकॉउंट नम्बर बदलून दूसरे अकॉउंट नम्बर टाकून ग्राम पंचायत कर्मचारी यांचे पगार गंडावन्यात आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सदरिल अपहार हा कोटयावधि च्या घरात असल्याचे पन ऐकावयास मिळत आहे
किनवट तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी वेतन अपहार प्रकरणात वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून तत्काळ चौकशी ची मांगनी जोर धरत आहे
ग्राम पंचायत कर्मचारी यांना कार्यालयीन कामा व्यतिरिक्त दूसरे पगारी काम करता येत नाही त्यामुळे कर्मचारी यांचे कुटुंब येणाऱ्या पगारी वर अवलंबून असते पन त्यांच्या हक्का च्या पगारीवर असे डल्ले पडत असल्याने ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या कुटुंबवर उपास मारिचे संकट ओढावले आहे
