दिवसा काळी पिवळी ची वाहतूक सुरु मग रात्री ला दुचाकी वरती सिंदखेड पोलिस स्टेशन कडून कार्यवाही करण्यात आली का?


पोलिस प्रशासन हफ्ते घेवून काली पिवली ला मुभा देतात का ?
काली पिवली च्या अवैध्य वाहतुकीवर कार्यवाही होनार नाही का?
जनतेच रोचक सवाल

मौजे सारखनी येथे भर दिवसा काळी पिवळीच्या मध्यमातुन अवैध प्रवासी वाहतुक केली जाते पण यांच्या कडून पोलिस प्रशासनाला मासिक हफ्ते पोहचत असल्याने पोलिस प्रशासन यांच्या वरती कार्यवाही करत नाही अशी चर्चा गावातील नागरिकांमध्ये दिसून आली. काल दिनांक 18/04/2022 रोजी मौजे सारखनी येथे दुचाकी वरती पोलिस स्टेशन सिंदखेड़ यांच्या कडून झालेल्या कार्यवाही नंतर जनतेत मात्र रोष आहे.
पोलिस स्टेशन सिंदखेड यांच्या कडून काळी पिवळी वरती कार्यवाही करुन सदर होत असलेली चर्चा खोटी असल्याचे पोलिस स्टेशन सिंदखेड यानी दाखवतील का हे विशेष.