मौजे सारखनी येथे काळी पिवळीला अवैध वाहतुकीस मुभा पण ऑटो वरती पोलीस प्रशासनाची कार्यवाही

सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथे तेलंगणा-आंध्रप्रदेश पासिंग असणाऱ्या तसेच इतर पासिंग असणारे पॅसेंजर ऑटो आणि काळी पिवळी सातत्याने अवैद्यरित्या पॅसेंजर वाहतूक करतांना किनवट-माहूर आणि मौजे सारखनी मांडवी मार्गाने दिसून येतात.
किनवट-माहूर मार्गाचे नविनीकर्णाचे काम सुरू असून सदरील मार्गाचे काम मौजे सारखनी येथील वसंतराव नाईक चौकात दि.14/02/2022 रोजी आठवडी बाजार च्या दिवशी सुरू होते सदरील चौका लगत मौजे सारखनी येथील आठवडी बाजार देखील सदरील रोजी भरल्याने वाहतूक कोंडी चा प्रश्न निर्माण होत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले सदरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस स्टेशन सिंदखेड अंतर्गत कार्यवाही करते वेळेस आठवडी बाजार करिता जवळील खेडे गावातून आलेल्या पॅसेंजर ऑटो वरती दंडात्मक कार्यवाही करण्यात आली सदरील कार्यवाही ही फक्त ऑटो आणि ऑटो चालका पुरतीच का केली गेली काळी पिवळी देखील नेहमी प्रमाणे अवैध पॅसेंजर वाहतूक करत होत्या त्यांच्या वरती पण कार्यवाही करायला हवी होती अशी मते ऑटो चालक यांनी व्यक्त केली