
पायात बूट घालून रस्त्याकाठच्या शेतांची केली पाहणी?
किनवट-माहूर दोन्ही तालुक्यास नदीचे पात्र जुळून गेले असल्याने शेतातील आणि गावातील पाणी नाल्या मार्गे नदीस जाऊन मिळते पण
या वर्षी अतिवृष्टी मुळे नदीस मोठा पूर आल्याने गावातील आणि शेतातील पाणी नाल्या मार्गे नदी पर्यंत तर पोहचले पण नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नाल्यातील , गावातील आणि शेतातील पाणी स्थिर झाले सलग आठ दिवस अश्याच प्रकारे पाणी शेतात भरून राहिल्या मुळे शेतातील उभ्या पिकास मर आली आहे.आता पुन्हा पेरणीची वेळ आणि पैसा नसल्याने शासना कडून काही सहाय्यता मिळेल अशी अपेक्षा किनवट-माहूर मधील पुरग्रस्त जनतेला होती पण खासदार हेमंत पाटील यांच्या सोबत किनवट-माहूर महसुल चे कर्मचारी रस्त्या काठी असलेल्या शेताची पाहणी करत जनतेच्या नजरेत येताच
किनवट तहसील कार्यालय अधिकाऱ्यांनी राशन मध्ये केलेल्या घोळा प्रमाणे पूरग्रस्त सहाय्यता निधी मध्ये देखील घोळ होतो की काय अशी चर्चा सगळी कडे जोर धरू लागली आहे. खासदार हेमंत पाटील महसूल ककर्मचाऱ्यां प्रमाणेच जनतेशी वागतात का या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.
