
मालकी कागदपत्रे देण्या साठी आधी कर व फेरफार आकारणीच्या नावाखाली तोंड पाहून पैश्याची आकारणी करण्याचा प्रकार मौजे सारखनी येथील ग्राम सेवक करत असल्याचे ऐकावयास मिळत आहे?
मौजे सारखनी येथील ग्राम पंचायत चा कारभार पाहून लक्षात येते की ग्राम पंचायत सारखनी हे ग्राम सेवक आणि पंचायत समिती किनवट चे वरिष्ठ अधिकारी यांचा पैसे पचविण्याचा अड्डा तर नाही बनला?
ग्राम सेवक यांना ग्राम पंचायत कार्यालय अंतर्गत येणारे कोणतेही कागदपत्रे मागितली असता अगोदर घर ट्याक्स पाणी पट्टी भरावी लागते
आणि फेरफार जर करायचा असेल तर खरेदी रक्कमेच्या 2 टक्के रक्कम ग्राम सेवकास यांच्या कडून फेरफार च्या नावाखाली
देणगी पावती देऊन आकारली जाते
सदरील फेर फार रक्कम ग्राम पंचायत ला देत आहोत की एखाद्या मंदिराला देत आहोत हे नागरिकांना कळेना से झाले
वरिष्ठ अधिकारी डोळे बंद ठेवण्याचे किती घेतात अशी चर्चा नागरिक करत आहेत
