
पोलीस प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट विभागाने मौजे सारखनी येथे वाहन पत्राची तपासणी सुरू करायला हवे अशी मागणी वाहन मालक यांच्या वतीने करण्यात येत आहे
मौजे सारखनी येथील बाजार पेठ मोठी असून सदरील बाजार पेठेला जास्त खेडे जुळून असल्याने येथील माल खरेदी वर्ष भर सारख्या प्रमाणात सुरू असल्याने येथील माल वाहतुक लक्षात घेता काही माल विक्रेत्याने स्वतः माल वाहतूक गाड्या आणून माल वाहतूक सुरू केली आहे
पण सदरील गाड्या चे इंशोरन्स पासिंग आणि इतर वाहतूक परवाने न काढता माल विक्रेत्यांनी सदरील गाड्या चा वापर वाहतुकी साठी करून शासकीय कर गंडवत असल्याचा आरोप परवाना धारक माल वाहन मालकांन कडुन करण्यात येत आहे
सदरील प्रकरणात संबंधित शासकीय अधिकारी यांच्या कडून चौकशी करण्यात यावी अशी अपेक्षा वाहन मालकांन कडून करण्यात येत आहे
