कृषि विभागाच्या अशीर्वादाने कृषि सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची फसवणूक आणि लूट करत आहे ?

प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट

शासन मान्यता नसलेले कीटनाशक खुले आम किनवट तालुक्या सह सारखनी येथे कृषि सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची दिशा भूल करुन अधिक दरात विकत असल्याचे समोर आले आहे.पण सदरील कारभार कृषि केंद्र चालक कृषि विभागाची परवानगी घेऊन करत आहेत?

कृषि कर्मचारी आणि वरिष्ठ जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर कार्य कोणत्या प्रकारे करतात याची कल्पना सर्व सामान्य शेतकऱ्यांना आहे.पण जनतेच्या महसूल मधुन कृषि विभाग कर्मचार्यांच्या पगारी कोणत्या कार्याकरिता होतात याचे भान कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना असायला हवे.

कृषी विभागाच्या
कर्मचारि आणि वरिष्ट अधिकारी यांच्या कर्महिनते मुळे गरीब शेतकऱ्यांची खुले आमलूट होत आहे
त्यामुळे शेतकरी हतबल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कृषि विभागाने पाऊले उचलावित आणि तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे