
मौजे सारखनी येथील ग्राम सेवक ताडेवार यांनी घरकुल लाभार्थी यांच्या घरी भेट देऊन पक्के घर आणि लाभार्थी गावात आहेत की नाही याची चौकशी न करता दी.02/11/2020 रोजी ग्राम पंचायत कार्यालय येथे घरकुल लाभार्थ्यांच्या विषयात एक ठराव पारित केला सदरील ठराव हा घरकुल प्रपत्र अ व प्रपत्र ब मधील लाभार्थी हे कोणत्या कारणास्तव अपात्र असल्याचे कारण नमूद करून सदरील ठराव पारित करण्यात आला पन सदरील ठरावा मध्ये लालखान हमीदखान पठाण यांचे नाव कायमस्वरूपी स्थलांतर म्हणून घरकुल प्रपत्र ब मधून वगळण्यात यावे अशी विनंती पंचायत समिती कार्यालय येथे सदरील ठराव च्या माध्यमातून करण्यात आली
पण सदरील लाभार्थी हे मौजे सारखनी येथेच राहत असून लाभार्थी नामे लालखान हमीदखान पठाण यांनी त्यांचे आधार कार्ड आणि मतदान ओळख पत्र दाखविले आहे आणि सदरील ग्राम सेवक हे माझ्या घरी चौकशी करण्यास आलेले नाहीत असे देखील लाभार्थी यांनी सांगितले
ग्राम सेवक ताडेवार यांनी ग्रामसेवक पदाचा दुरुपयोग करत इतर घरकुल लाभार्थ्यांना पैश्याची मांगणी केली आणि लाभार्थ्यांनि पैशे न दिल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची नावे ग्राम सेवक यांनी वगळली अशी चर्चा सारखनी परिसरात ऐकावयास मिळत आहे
ग्राम पंचायत कार्यालयात सामान्य कर वसुली गावठाण प्रमाण पत्र GST परतावा नवीन प्लॉटिंग मध्ये अफरा तफर असे अनैक प्रकारचे कारस्थान केल्याचा आरोप देखील गावकर्यांन कडून केला जात आहे सदरील इतक्या विषयात अफरा तफर करणाऱ्या ग्रामसेवक यांना पदोन्नती कशी देण्यात आली असा सवाल देखील नागरिक करत आहेत
ग्रामसेवक ताडेवार हे जो पर्यंत ग्राम पंचायत सारखनी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते तितक्या कार्यकाळाची रीत सर उच स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मांगणी नागरिक करत आहेत
