
1
तहसील मधील घरकुल रेती घोटाळा पंचायत समिती मानधन व अन्य विभाग मधील घोटाळे अश्या बऱ्याच घोटाळ्यांनी किनवट माहूर तालुके बरबरळले आहेत
शासकीय योजना फक्त कागदोपत्री हाताळून योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या जागी आपल्या घरी कसा येईल यात किनवट माहूर मधील अधिकारी यांना महारात प्राप्त आहे
दिवाळी टोकला येऊन थांबली आहे पण अद्याप गोर गरीब यांना कंट्रोल वाटप झालेले नाही कंट्रोल वाटपा वर गरीब व लाचार लोक अवलंबून असतात म्हणून या कडे अधिकारी लक्ष देत नाहीत का? किनवट तालुक्यातील काही गावात माहे सप्टेंबर आणि अक्टोबर चे कंट्रोल अद्याप वाटप झालेले नाही
पण अधिकारी यांच्या साठी ही बाब चिंतेची नाही का ?
कोरोना लसीकरण महत्वाचे आहेच पण पोटाला भाकर देखील तितकीच महत्वाची आहे या कडे अधिकारी यांनी लक्ष द्यायला हवे
