पोलिस स्टेशन सिंदखेड कडून अवैध धंद्यांना अभय ,अवैध धंद्यांविरोधात मात्र बातमी लिहिणाऱ्यांच्या वरती खोटे आरोप

जीवाला बरे वाईट झाल्यास जवाबदार कोन असा प्रश्न करत
गजानन पवार यांनी मुख्यमंत्री साहेबांन कडे तक्रार केली सादर

माहूर तालुक्यातील मौजे सारखनी येथिल अवैध धंद्याची तक्रार श्री पोलिस अधीक्षक नांदेड़ यांच्या कड़े गजानन पवार करत असल्याचा आरोप सिंदखेड़ पोलिस स्टेशन कडून होत असल्याने मौजे सारखनी येथील अवैद्य धंदे करणाऱ्याची नजर गजानन पवार यांच्या वरती असून त्यांच्या जीवाला बरे वाईट झाल्यास जवाबदार कोण असा प्रश्न त्यांनी लेखी तक्रारीतुन
मुख्यमंत्री साहेब
जिल्हा अधिकारी साहेब
पोलिस अधीक्षक नांदेड़
याना विचारला आहे. गजानन पवार हे मौजे सारखनी येथे वार्ताहार तथा पत्रकार म्हणुन कार्य करतात त्यांच्या बातम्याने अवैध धंदे करणाऱ्याची झोप उड़ाली असल्याने पोलिस स्टेशन सिंदखेड ला हाताशी धरून त्यांच्या विरोधात कट रचला जात असल्याची शक्यता दर्शवली जात आहे,.
त्यांच्या वृतिने या अगोदर देखील त्यांच्या वरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न रेती तस्करानी केला होता .
पोलिस स्टेशन सिंदखेड़ चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री तीडके साहेब यांची गजानन पवार यांनी भेट घेतली असता श्री तीडके यांनी सांगीतले की आपण सतीश या नावाने पोलिस अधीक्षक नांदेड़ यांना मॅसेज पाठवुन मौजे सारखनी येथील अवैध धंद्यांची माहिती देता असा आरोप गजानन पवार यांच्यावर केला. त्याबाबतचे माझ्या कड़े पुरावे आहेत
त्यावर गजानन पवार यांनी पुरावे दाखविण्यास सांगितले असता श्री तीडके साहेब यांनी पुरावे देण्यास नकार दिला .
वरील घटनेचा उल्लेख करत गजानन पवार यांनी तिडके यांच्या बदलीची देखील मागनी केली आहे.मौजे सारखनी येथे .पोलिस चौकी च्या बाजुला अवैध काळी पिवळी वाहतुक केली जाते .खुले आम गुटखा विक्री होते तसेच पोलिस चौकी समोरून रेती ची तस्करी केली जाते या अवैध धंद्यांवरती कार्यवाही करण्याचे सोडून पोलिस प्रशासन पत्रकारांना त्रास देतात
पोलिस प्रशासन सदर घटनेची दखल केव्हा घेईल याकड़े जनतेचे लक्ष लागले आहे.