ग्रामसेवक वाडेकर यांच्या नांदेड वाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर बेतणार?

सतत तक्रारी करून पाण्याचे व्यवस्थापन न केल्याने नागरिकानी स्वतः उचलला नाली स्वछ करण्याचा विडा

वॉर्ड क्रमांक 3 मधील महत्वाचा दळण वळण साठी उपयुक्त असलेला रस्ता हा पूर्ण पने पाण्याने भरलेला असून सदरील मार्गावर पाणी थांबले जाते म्हणून गेल्या काही महिन्या पासून ग्रामसेवक यांना सूचना नागरिकांनी दिल्या होत्या पण ग्रामसेवक वाडेकर हे नांदेड वरून ये जा करत असल्यामुळे त्यांना या विषयाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नसल्याने काल रोजी पडलेल्या पावसाने रस्ता हा तुडुंब भरला असून सदरील रस्ता हा ये जा करण्यासाठी प्रमुख आणि महत्वाचा मानला जातो
वरिष्ठांनी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन काम करायला हवे असे मत नागरिक व्यक्त करीत आहे