मौजे सारखनी येथील मेडिकल आणि डॉक्टरांची झोप महिलेच्या जीवावर बेतली मेडिकल वरती कचे बिल देऊन रुग्णांची लूट आरोग्य अधिकारी हप्ते घेऊन झोपेत?

मौजे सारखनी येथे
दि.27/05/2022 रोजी
रात्रीला सुमारे 10.44pm वाजता सारखनी येथून सुमारे 10 km अंतरावर असलेले गाव मळी येथील एका गर्भवती महिलेस पोटात दुखत असल्यामुळे प्राथमिक उपचारास सारखनी येथे आणण्यात आले असता प्रत्येक डॉक्टर यांच्या दारा समोरून जाऊन डॉक्टर यांना वारंवार आवाज देऊन एकही डॉक्टर उपचार सेवेस उठले नाही
बराच वेळ झाल्याने सदरील महिलेच्या गर्भास धोका निर्माण झाला होता गर्भवती महिला एका गरीब कुटुंबातील असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी पैसे अभावी जाऊ शकत नसल्यामुळे दूध नेणाऱ्या वाहनात त्यांनी स्वतःला सावरत तालुका गाठला सुदैवाने महिलेच्या गर्भास काही झाले नाही अशी माहिती त्यांच्या कुटुंबांनी दिली आहे

आरोग्य अधिकारी यांनी मौजे सारखनी येथील आरोग्य व्यवस्थे कडे लक्ष द्यायला हवे
आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला होत असलेल्या वेदने कडे कोणीच लक्ष देत नसल्याचे गर्भवती महिलेने सांगितले आहे
आरोग्य अधिकारी हप्ते घेतात म्हणून सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी डॉक्टर आणि मेडिकल वाले खेळत असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबांनी केला आहे

मौजे सारखनी येथिल दवाखाने फक्त लूट करण्या साठी बसले असल्याचे बऱ्याच रुग्णांन कडून ऐकण्यात आले आहे
मेडिकल आणि डॉक्टर यांच्या कडून रुग्णांना मिळत असलेली सेवेची पाहणी केली असता
निम्म्या मेडिकल वरती तर पक्के बिल देत नसल्याचे समोर आले आहे
रात्रीला डॉक्टर यांनी सेवा द्यावी आणि रुग्णास आरोग्य प्रदान करावे या करिता आरोग्य अधिकारी यांनी झोपेचे सोंग सोडून कार्य दक्षता घेऊन मौजे सारखनी येथील डॉक्टर आणि मेडिकल यांच्या कडे लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करत असनाऱ्यावर कडक कार्यवाही करावी अशी जनतेतून मागणी होत आहे