तोतया पत्रकार आणि ढगे नामक अज्ञात व्यक्ति ने किनवट-माहुर महसूल कर्मचाऱ्यांना काबिज केले ?

प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट

मौजे दहेली – सारखनी येथे टिप्पर ने रेती तस्करी खुले आम सुरु
तोतया पत्रकार आणि ढगे नामक व्यक्तिने रेती तस्करी ला सुरुवात केल्याची घटना मौजे सारखनी येथे बघण्यास मिळाली
मौजे सारखनी येथे शिवजी चौक जवळ देशी दारू चे दुकान असून
दुकाना लगत शेत मार्ग रस्ता आहे
रात्रीला सुमारे 10.30 वाजता शेतात रात्री ला शेतकरी जात असताना त्यांच्या अंगावर एक भर धाव टिप्पर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी बाजूला धाव घेतली
टिप्पर मध्ये रेती होती आणि ती रेती देशी दारुच्या दुकाना लगत टाकायची असल्याने टिप्पर पुढे जावून अजुन मागे आले आणि रेती खाली करू लागले.अंगावर आलेले टिप्पर थांबल्याचे लक्षात येता शेत मजुराणी टिप्पर च्या थोड्या अंतरावर जावून टिप्पर वाल्याला विचार पूस करण्याचा प्रयत्न केला पण अंधार असल्या मुळे आणि टिप्पर अंगावर आल्या मुळे टिप्पर मधील व्यक्तिना दुरुन विचारपूस केली असता टिप्पर मधील व्यक्तिने स्वतःचे नाव ढगे सांगत आपला बॉस पत्रकार असून महसूल कर्मचारी यांच्याशी ठरवून रेती आणतो असे सांगितल्याची माहिती शेतकरी आणि मजूरानी दिल्याची चर्चा मौजे सारखनी परिसरात ऐकायला मिळत आहे .

तहसील कर्मचारी किनवट-माहुर
यांनी घटनेची दखल घेवून तातडीने पाउल उचलून स्वत ला चर्चे मधून वेगळ करायला हवे