मौजे सारखनी परिसरात बिबट्या वाघाची दहशत

मांडवी वन क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथील वन क्षेत्रा मधील वन्य प्राण्यासह आता बिबट्याचा वावर आढळून आला
मौजे सारखनी येथिल विजय चव्हाण यांच्या शेतातील गोठया मध्ये गायी बैल या जनावरासह ते लघु शेळी पालन देखील करत असतात
दि.29/09/2021 रोजी रात्रीच्या पाळी ला खाजगी कारणास्तव ते शेतात जाऊ शकले नाही
म्हणून सकाळी त्यांनी पहाटेच शेत गाठले असता शेतातील गोठ्या मध्ये असलेले पशु त्यांना विस्कळीत अवस्थेत दिसून आले त्या नंतर त्यांनी गोठ्याची पाहणी केली
गोठ्याला एका बाजूने झालेली तूट फूट त्यांच्या नजरेत आली
पुढील पाहणी केल्यावर मय्यात अवस्थेत त्यांची शेळी त्यांना दिसली व आजू बाजूस वन प्राण्याचे पायांचे ठसे दिसून आले सदरील बाब वन विभागाला त्यांनी कळवली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता सदरील पवालाचे ठसे बिबट्या चे असल्याचे स्पष्ट झाले
विजय चव्हाण यांच्या शेळीचा मोबदला त्यांना मिळावा यासाठी वन अधिकारी प्रयत्न करत आहे
सदरील घटना गावालगत घडल्या मुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांना गावा पासून दूर ठेवण्या साठी वन विभागाने तातडीने उपाय करण्याची मागणी गाव करी करत आहे