
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे,भद्रावती
चार तास काम बंद आंदोलनानंतर तहसीलदार साहेब भद्रावती यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे.
तहसीलदारांच्या मध्यस्थीने दिनांक 14.7.2021 रोजी दुपारी 12 वा एम्टा प्रशासन व आंदोलकांमध्ये बैठकीचे आयोजन
भद्रावती तालुक्यातील बरांज येथील कर्नाटका एम्टा कोल माईन लिमिटेडमध्ये स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस दिवस ज्वलंत होत चाललेला आहे याचे फलित म्हणून आज भारतीय जनता युवा मोर्चाचे आकाश वानखडे यांच्या नेतृत्वात खदान बंद आंदोलन करण्यात आले व संपुर्ण खदान बंद करण्यात आली या आंदोलनात स्थानिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कोल माईन्स कंपनीचे काम बंद केले. कंपनी मध्ये काम बंद आंदोलन चालु असताना तहसीलदार साहेब भद्रावती आणि पोलीस प्रशासन भद्रावती
यांच्या मध्यस्थीने स्थानिकांना न्याय देण्यासाठी 14 .7. 2021 रोजी दुपारी 12 वा तहसीलदारांनी कंपनी व स्थानिक लोकांमध्ये बैठकीचे आयोजन केले
दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे आकाश वानखडे व कंपनीचे जनरल मॅनेजर वासाडे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची व वाद झाला स्थानिकांच्या रोजगाराचा संदर्भात वानखडे यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. यामध्ये कमालीची गोष्ट बघण्यात आली म्हणजे पोलिसांनी आंदोलन स्थळाला प्रथम भेट दिली. त्या नंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांवरून जोरदार कंपनीचा विरोध करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व तहसीलदार व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कंपनीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. स्थानिकांना न्याय मिळे पर्यंत स्वस्थ बसनार नाही व स्थानिकांना न्याय द्या अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू अशी चेतावणी आकाश भाऊ वानखडे यांनी दिली
यावेळी ग्रामपंचायत कढोली सदस्य ललिता ताई आत्राम ग्रामपंचायत सदस्य निलेश मेश्राम भाजपा महिला आघाडीच्या सौ संध्याताई सिडाम, मंगला मत्ते, कांताबाई घुगुल, शालिनीताई बोडेकर, अनिताताई परचाके, सारिकाताई मत्ते, छायाताई कुडमेथे, इंदुताई पावडे,टेकाम ताई भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी विस्मय बहादे ,चैतन्य कोहळे व तसेच प्रदीप मांडवकर, ,गणेश खैरवार ,शिवशंकर मडावी,स्वप्निल पिदुरकर अक्षय परचाके शुभम खंडाळकर आशिष घुगुल, प्रतीक परचाके
जसवंत सिंग,आभास पेटकर, राजू शेरकुरे ,संदीप वनकर, रंजीत शेवाडिया, विकी सलामे, विनोद मोहितकर, संदीप मेश्राम,नितेश बानोत यांचे सह असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या
