
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
गेल्या चार दिवसा पासून तहसीलदार डाँक्टर रविंद्र कानडजे हे आठ ते दहा दिवसा च्या रजेवर गेल्या चा सुवर्ण संधी फायदा अवैध रेती तस्करांनी उचलला असून,वाऱ्हा रेती घाटां मधून जवळपास पंधरा ट्रॅक्टर दिवसरात्र रेती चा उपसा करुन प्रशासनाचा महसूल बुडवित आहे.
सध्या लाॅकडाऊन नंतर धुमधडाक्याने बांधकामे सुरु झाली,रेती अत्यावश्यक चं असल्याने रेती ची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून,साहेब सुट्टी वर इतरांचे अर्थ पूर्ण दुर्लक्ष याचाच अलगद लाभ नेहमी चेच अवैध रेती तस्कर उचलत आहे. पोलिस स्टेशन राळेगांव व महसूल प्रशासनाने विशेष लक्ष घातलं तर एकाच दिवसात यांचा बंदोबस्त होऊ शकतो हे विशेष…
