आदिवासी बांधवांना मालकी हक्क प्रमाणपत्र व ७/१२ चे जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते वाटप

हिमायतनगर प्रतिनिधी :(परमेश्वर सुर्यवंशी)


हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळके वाडी येथे आदिवासी बांधवांना मालकी हक्क प्रमाणपत्र व ७/१२ चे मा जिल्हा अधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या वाटप करण्यात आले प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्याच बरोबर स्व खा राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील देण्यात आली आणि पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे
जवळपास आदिवासी बांधवांना १२ -१३ मालकी हक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यामुळे आदिवासी बांधवांना त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पध्दतीने करता येईल गेल्या काही वर्षांपासून हे मालकी हक्क दावे मिळाले नसल्याने येथील लोकांना फक्त कसरत करुन व माळरानावर जावून आपला उदरनिर्वाह करावा लागत होता आतमात्र तो आपली जमीन आपल्या पद्धतीने करुन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती मध्ये योग्य उत्पन काढुन सुखी आनंदी जीवन जगातील असा विचार देखील जिल्ह अधिकारी यांनी मांडला आहे तरी काही आदिवासी बांधवांचे मालकी हक्क प्रमाणपत्र मिळाले नाही अशा लोकांना देखील काही दिवसांमध्ये मिळून देऊ असा विश्वास देखील जिल्हा अधिकारी यांनी दाखवला आहे.आज संपुर्ण महाराष्ट्रात कोरोणा महामारीचे संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र आपण योग्य पध्दतीने त्यांचे संरक्षण केले तर ती संख्या कमी होईल त्यासाठी आपण को व्याकसिन घेणें गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीने लस घेतलीच पाहिजे जर आपण सर्वांनी लस घेतली तरच आपण आपल्या कोरोणामूक्त होऊ शकतो त्यासाठी प्रत्येकांनी लस घेणे आवश्यक असे आवाहन जिल्हा अधिकारी यांनी नागरिकांना आपल्या मनोगतातुन केले त्याच बरोबर आपल्या मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मनोगत मांडत असताना मा स्व खा. राजु सातव यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सभागृहात त्यांची उनिव भासतं आहे . असे व्यकतव्य त्यांनी यावेळी केले आज हे भव्य दिव्य कार्यक्रम खरच आदिवासी बांधवांचे फलित आहे आदिवासी बांधवांना आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आदिवासी बांधवांना मी कधीच कमी पडणार नाही असे वक्तव्य देखील माधवराव पाटील जवळगावकर यांनी यावेळी केले तर याचबरोबर शासकीय आश्रमशाळा वसतिगृह जाणार्या रस्त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले असे अनेक विकासकामे मार्गी लागतील असे वक्तव्य माधवराव पाटील यांनी मनोगतात व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवर हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हा अधिकारी डॉ विपिन इटनकर मा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर मा क्रितिकुमार पुजार सह जिल्हा अधिकारी किनवट मा शिवराज डापकर उपजिल्हा विभागीय हदगाव मा डि एन गायकवाड तहसीलदार हिमायतनगर संध्या डोके वनपरिक्षेत्र सुधिश माजरंमकर गटविकास अधिकारी हिमायतनगर उपसरपंच संजय माजळकर व समस्त गावकरी मंडळी वाळके वाडी उपस्थित होते.