
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
वरोरा:- संजय गांधी निराधार योजना अंतर्गत विविध योजनेच्या लाभ देण्याबाबतचे अर्ज Online स्वरुपात स्विकारण्यात येतात. परंतू असे निदर्शनास आले की, अनेक वृध्द तसेच गरजू लाभार्थी ग्रामीण भागात राहत असल्याने ते तालुक्याचे ठिकाणी येवून Online अर्ज करु शकत नाहीत. त्यामूळे काही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते. तसेच कोविड-19 महामारीमध्ये अनेक कमावत्या व्यक्ती मृत्यु पावल्याने देखील अनेक कुटुंबांना आधाराची आवश्यकता आढळून आलेली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता वरोरा तालुक्यातील सर् एक दिवस निर्धारीत करुन पात्र लाभार्थ्यांचे Offline अर्ज स्विकारण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. बोर्डा ग्रामपंचायत येथे दिनांक १९.०७.२०२१ विशेष मोहीम कॅम्प घेण्यात आला. वरोरा तालुक्याचे तहसीलदार प्रशांत बेंडसे यांच्या मार्गदर्शनात या विशेष मोहिमेचा शुभारंभ बोर्डा गावात करण्यात आला. बोर्डा गावातील शिबिरात एकूण 20 वृद्धांनी या योजनेचा लाभ घेतला .बोर्डा गावाच्या सरपंच सौ.ऐश्वर्या खामनकर ,उपसरपंच राहुल ठेंगणे ,तलाठी परमेश्वर उगलमूगले यांची विशेष उपस्थिती होती.
