
भारतीय मुस्लिम परिषद शाखा वरोराच्या वतीने निवेदना मार्फत मागणी करण्यात आली की महाराष्ट्र राज्यातील मागास मुस्लिमांच्या शासकीय डॉ. महमदुर्रहमान कमेटीच्या अहवालावरून आणि न्यायमूर्ति सच्चर रिपोर्ट च्या संदर्भाने महाराष्ट्र सरकार ने अध्यादेश क्रमांक 14, 9 जुलाई 2014 च्या अन्वये महाराष्ट्रातील मागास मुस्लिमांना शासकीय नौकऱ्या आणि शिक्षणात 5% आरक्षण प्रदान केले होते.
हे आरक्षण संविधानाच्या अनुच्छेद 15(4), 15(5), 16(4) व 46 मधील विशेषप्रवर्ग आरक्षण तरतूद नुसार “विशेष मागास प्रवर्ग अ” अनुसार हे आरक्षण संपूर्ण घटनेच्या चौकटित प्रदान केले होते.
याला ऐतिहासिक संदर्भ म्हणून आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी 1902 मधे दिलेल्या मागासवर्गीय आरक्षणात अनुसूची मधे आरक्षणासाठी मुस्लिम मागासवर्ग अशी नोंद घेतल्या गेली आहे!
मुंबई प्रशासनाने 23 एप्रिल 1942 रोजी काढलेल्या आरक्षणाच्या अधिसूचनेत मागासवर्ग म्हणून अनुसूची 155 वर मुस्लिमांची नोंद आहे.
महाराष्ट्र शासनाने जुलाई 2014 मधे मुस्लिमांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने हे आरक्षण प्रदान केले होते.
परंतु, न्यायालयीन वादात हे आरक्षण असताना, मुंबई उच्च न्यायालयाने नौकरीतील आरक्षणवार स्थगिती दिली, मात्र शैक्षणिक आरक्षण चालू ठेवण्यास मान्यता दिली असताना देखील, तत्कालीन भाजपा सरकारने हे अध्यादेश 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वी दोन्ही सभागृहात चर्चेस मांडले नाही, कारणास्तव हा अध्यादेश अपगत, निकामी झाला आणि मुस्लिमाना मिळालेल्या आरक्षणापासुन हा समाज वंचित राहिला!
मुस्लिमांचे आरक्षण पूर्णतः संविधानिक असून ते पुनर्स्थापित करने हे राजनैतिक न्याय आणि कर्तव्य आहे, अशी आमची भावना आहे!
न्यायमूर्ति सच्चर आणि डॉ. मेहमुदुर्रहमान कमेटिने महाराष्ट्रातील 70% मुस्लिम समाज हा शैक्षणिक, आर्थिक आणि समाजिक दृष्टया अत्यंत कमकुवत असल्याचे प्रत्यक्ष वास्तव समोर मांडले आहे! आज शाशन प्रशाशनात मुस्लिम समाज केवळ 2% आहे! दरिद्री रेषेखाली 29%, तर श्रमिक म्हणून 32%, ग्रामिण क्षेत्रात 70% मुस्लिम कष्टकरी, शेतकरी म्हणून जगतो आहे! त्यांच्या सर्व समाजासोबत समतोल विकासासाठी आरक्षण देणे अत्यंत गरजेचे असलेल्या मूळ महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर या वर विचार करून 5% शैक्षणीक आरक्षण देन्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देते वेळी भारतीय मुस्लिम परिषदेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रा. जावेद पाशा सर,महिला अध्यक्ष ताहिरा शेख पाशा, मोहसीन सैय्यद, मूजम्मील शेख ,अयुब खान,प सलीमशेख, शफी भाई, मोहम्मद शेख, बशीर भाई, पाशा सैय्यद, अशपाक शेख, राहील पटेल, नबी कुरेशी, बशीर कुरेशी, दाऊद खान, जुबेर शेख, नदीम शेख उपस्थित होते.
