
वरोरा शहरातील माढेळी नाका परिसरातील वीर सावरकर चौक येथे कुंभारे यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.त्यात चोरट्यानी सोने व रोख रक्कम लंपास केल्याचे उघड झाले आहे.
वरोरा
वरोरा शहरातील सुधीर कुंभारे व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक आहेत .28 मार्च रोजी सकाळी पति- पत्नी शाळेतून घरी आल्यावर त्यांना घरचे मागील दार उघडे असल्याचे दिसून आले.त्यानंतर बेडरूममध्ये शिरून चोरांनी दागिने व रोकड रक्कम लंपास केल्याचे उघड झाले.या संबंधी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली असून एकूण 2 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लांबविले.अजूनही चोरांबाबत काही सुगावा लागला नसल्याने पोलिसांच्या कारवाई कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्री सुरु झाल्यापासून चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद वाढत असल्याचे दिसून येत आहे.या आधी वरोरा शहरात झालेले दोन खून , बँक ऑफ इंडिया मध्ये 16 लाखाची चोरी झाली होती ,तसेच वरोरा शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर दिसत आहे.वरोरा शहरात खुलेआम अवैध धंदे सूरु आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वरोरा शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्याचे दिसून येत आहे.
