शिवसंपर्क मोहीमेला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, शेंबळ येथे शाखेचे उद्घाटन

प्रतिनिधी :- वरून त्रिवेदी, वरोरा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना संपर्क अभियान राबऊन आज दिनांक 19 जुलै 2021रोजी वरोरा तालुक्यातील शेम्बळ येथे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर नितीनभाऊ मत्ते व शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर रमेशभाऊ मेश्राम यांच्या उपस्थित , शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली, जय भवानी जय शिवाजी नारे लावत शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख वरोरा संदीपभाऊ मेश्राम,शिवसेना नगरसेवक दिनेशभाऊ यादव,युवा जिल्हा सरचिटणीस चंद्रपूर मनिष भाऊ जेठानी,युवासेना तालुका प्रमुख वरोरा भूषण बुरेले, युवा सेना शहर प्रमुख वरोरा प्रज्वल जानवे, शिवसैनिक अतुलभाऊ नांदे,विभाग प्रमुख प्रकाशभाऊ कुरेकार, शाखा प्रमुख लोकेशभाऊ धाबेकर, उपशाखा प्रमुख सतीशभाऊ निमकर,सचिव प्रशांतभाऊ जोगी, कोषाधक्षय सचिनभाऊ आसुटकर तसेच सर्व शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटक, पाधिकारी होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे यांनी शिवसंपर्क अभियानला सुरुवात करून शिवसेना शाखेचे उदघाटन केले . तसेच शिवसैनिकांना शिवसेना पक्षाबद्दल मार्गदर्शन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर नितीन भाऊ मत्ते यांनी केली.आपल्या राज्यात फक्त शिवसेनेचा भगवा असणार असे मत प्रत्येक शिवसैनिकांनी म्हटले.