

वरोरा तालुक्यातील मोखाडा या गावात 2 दिवस आधी विहिरीत वाघ पडला होता. वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर तो वाघ विहिरी बाहेर काढण्यात यश आले.
तर आज भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील वायगाव कुरेकार या रणदिवे शेतात वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.मृत वाघिणीचे वय अंदाजे 3 वर्ष आहे .शेतातील कुंपणाच्या करंट मुळे हा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होत पुढील तपास करीत आहे.
