महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चा 59 वा वर्धापन दिन वृक्षारोपण करून साजरा


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी,शिक्षक आणि सामाजिक बाबतीत लढणारी एकमेव शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेच्या 59 व्या वर्धापन दिन आज दिनांक 22 जुलै 2021 ला पंचायत समिती राळेगाव च्या आवारात पंचायत समिती चे सभापती माननीय श्री प्रशांत भाऊ तायडे, जि प सदस्य माननीय श्री चित्तरंजन दादा कोल्हे,गट विकास अधिकारी माननीय श्री रविकांत पां.पवार साहेब,विस्तार अधिकारी शिक्षण श्रीमती सरला देवतळे मॅडम, विस्तार अधिकारी श्री सागर विठाळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष महेश सोनेकर, गजानन यादव,हेमंत निंबुलकर, विजय दुर्गे,हनुमान जुमनाके,संदिप क्षिरसागर, संदिप टुले, विशाल किनाके,अमोल पोहनकर, सागर धनालकोटवार, संजय एकोणकर,सागर इंझळकर, चिंतामण किनाके,विणायक एकोणकर,चिंतामण मलांडे, सतीश आत्राम,अविनाश ठाकरे,गिरीधर मांगुळकर, इंद्रायणी गावंडे,रीना चौधरी आदी शिक्षक बांधव उपस्थित होते.

आजचे वृक्षारोपण करिता ट्री गार्ड तयार करण्यासाठी यात श्री हनुमान जुमनाके सर आणि योगेश गलाट सर यांनी महत्वपूर्ण अशी जबाबदारी पार पाडली.