सप्नपूर्ती कंपनी चा प्रताप”,नऊ महिन्याचे वेतन न देता कामगारांना कमी केले

सप्नपूर्ती कंपनी मधील कामगारांना उपासमारीची वेळ

प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही

कुही :- कुही ग्रामपंचायतचे जेव्हा नगरपंचायत मध्ये रूपांतर झाली तेव्हा असे वाटायला लागले की नगरपंचायत चा विकास होईल मात्र विकाशाच्या नावावर कुही शहर पूर्ण पने भखास झाल्याचे चित्र दिसत आहे , नगरपंचायत च्या वतीने सप्नपूर्ती कंपनी नंदनवन नागपूर या कंपनीला 16/02/2017 या तारखीला घनकचरा उचलण्याची ( घंटागाडी चे )वर्क आडर दिले होते. त्या कारारम्यानुसार प्रत्येक कामगारांचे किमान वेतन , सुरक्षा कवच ,बँक खात्यात पैसे जमा करणे ,भविष्य निर्वाह निधी, इत्यादी करारनामे केले , परंतु सप्नपूर्ती कंपनीने या। करारनाम्याचे पूर्णपणे उल्लंघन करून कामगारांचे व नगरपंचायत ची फसवणूक केले आहे. यामुळे। कामगारांवर मोठा अन्याय झाला आहे. तसेच आकठोम्बर 2020 पासून ते जुलै 2021 पर्यंत एकूण नऊ महिन्याचे वेतन कामगारांना न देता कंपनी मालक सचिन मानकर याने कामावरून काडून ठाकले आहे त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, या विषयी कामगारांना पत्रकार बंधूनी केल्यानंतर त्यांनी सांगितले की , सप्नपूर्ती कंपनीचे सचिन मानकर आम्हाला पूर्वी पासून नाहक त्रास देत होते आम्हाला नऊ महिन्याचा वेतन जाणीव पूर्वक दिला नाही असे आरोप कामगारांनी या वेळी केला आहे , या विषयावर सखोल चौकशी केली असता सप्नपूर्ती कंपनी ला आर्थिक वर्षा 2017 ते 2020 पर्यंत असा तीन वर्षांचा करारनामा केला होता , त्यामध्ये प्रति महिना 2,48,000 दोन लाख अतथेच्चलीस असे ठरले होते , परंतु तीन वर्षे उलटून सुद्धा सप्नपूर्ती कंपनीचे अद्याप सुरू आहे, 16 महिने जास्त झाल्यानंतर नगरपंचायत ने टेंडर काढले। नाही हे विशेष या वरून कुठे तरी। पाणी मुरले असे वाटते यया कंपनीला ब्लॉग लिस्ट मध्ये टाकावे अशी मागणी जोर पकडत आहे, मागील तींन वर्षा पासूनया कामगारांना कामगार कायद्यानुसार किमान वेतन, pf ,विमा कवच , बँकेच्या मार्फत पगार इत्यादी या सारखे त्यांना द्यावे लागतील त्यामुळेच नऊ महिन्याचा पगार दिला नाही, या मध्ये कामगार स्वतः हुन काम सोडून जाईल अशी माहिती पुढे येत आहे कुही शहरातील जाणकार नागरिक दबक्या आवाजात बोलत आहेत “”वा सप्नपूर्ती कंपनी””