जि. प.शाळा दहेगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न,(खैरी केंद्रातील सर्व तेराही शाळांचा सहभाग)

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे दिनांक १७ जानेवारी ते १८ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव व खेळाच्या कौशल्याला वाव मिळण्यासाठी केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खैरी केंद्रांतर्गत येणाऱ्या तेरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कबड्डी, लंगडी ,खोखो व सांस्कृतिक कार्यक्रमात एकल नृत्य, नाटिका, गायन आदी कार्यक्रम पार पडले.
या केंद्रस्तरीय आयोजित क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात खैरी केंद्रातील सर्व तेरा शाळांनी सहभाग घेतला. आनंदमय वातावरणात सर्व खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. पक्रम क मध्ये वर्ग एक ते पाच वर्गाची मुले मुली सहभागी होते तर प्रक्रम् ब मध्ये वर्ग सहा ते आठ वर्गाची मुले मुली चा सहभाग होता. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये कबड्डी, लंगडी, खोखो ,१०० मीटर ,२०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळीफेक हे खेळ तर सांस्कृतिक कार्यक्रमात एकलनृत्य, सामूहिक नृत्य , नाटिका व गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमात केंद्रातील तेरा ही शाळांनी सहभाग नोंदविला.
. क्रीडा प्रकारात झालेल्या खेळामध्ये कबड्डी या खेळात आष्टोना, दहेगाव येथील शाळांचे संघ विजयी झाले तर लंगडी व खो-खो या खेळात दहेगाव शाळेतील संघाचे वर्चस्व राहिले. वैयक्तिक व सांस्कृतिक खेळात सर्व शाळेतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्व प्रकारच्या खेळातील विजयी शाळेचे संघ हे आता पुढील तालुकास्तरीय खेळात सहभाग घेतील. केंद्रस्तरीय खेळात खैरी केंद्रातील तेराही शाळांनी सहभाग घेऊन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आनंदमय वातावरणात चांगल्या रीतीने पार पडले. यात केंद्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.
सर्व विजयी चमूचे व सहभागी संघाचे खैरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कुंभलकर सर , दहेगाव शाळेचे मुख्याध्यापक देऊळकर सर यांनी अभिनंदन केले व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकाचे आभार व्यक्त केले.