
तालुका प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही
कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलमधील 18 कोतवालांची पदे रिक्त आहेत . या पदासाठीची लेखी परीक्षा लवकरात लवकर घ्यावी , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांनी केली . तशा आशयाचे निवेदन त्यांनी पालकमंत्री राऊत व जिल्हाधिकारी आर . विमला यांना देण्यात आले . महसूल विभागाला गावपातळीवर मदतनीस म्हणून कोतवाल काम करतो . तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलमधील कोतवालांची 18 पदे रिक्त आहे . तालुक्यातील सरासरी रिक्तपदाची टक्केवारी 50 आहे . ही पदे बहुतांश पुनवसीत गावातील तसेच पूरग्रस्त तलाठी साझातील आहे . कोतवाल भरतीबाबत तहसीलदार कुही यांनी कार्यवाही सुरू केली होती . त्यासाठी उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आले होते . 2020 ला कोतवालांची लेखी परीक्षा घेण्याचे
,,प्रयोजन झाले होते . उमेदवारांना प्रवेशपत्रही देण्यात आले होते . मात्र , काही कारणामुळे परीक्षेच्या तीन दिवसाआधी परीक्षा स्थगीत करण्यात आली . परंतु , आता वर्षभराचा काळ लोटूनी ती परीक्षा झालेली नाही . त्यामुळे ग्रामीण भागातील नैसर्गीक ,आपत्ती पूर परिस्थिती बघता तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
,,रोखण्यासंबधी करावयाच्या उपाययोजनाकरिता स्थानिक पातळीवर कोतवाल हा महसूल विभागाचा कर्मचारी असणे अत्यावश्यक असल्याने स्थगीत करण्यात आलेली लेखी परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी , अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली . निवेदन सादर करते वेळी उपस्थित संदीप कामळे, बल्लू पाटील उपस्थित होते.
