
1
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्हयातील काही भागात अतिवृष्टीमुळे तसेच आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे व नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभाग अथवा पिकविमा कंपणीकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन कर्तव्यदक्ष खासदार भावनाताई गवळी (पाटील) यांनी केले आहे.
यवतमाळ जिल्हयातील काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. याशिवाय अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पुर आल्याने पिके खरडून निघाली. या संदर्भात शेतक-यांनी झालेल्या नुकसानीच्या तक्रारी करणे गरजेचे आहे. मागील हंगामात सुध्दा प्रचंड नुकसान झाले असतांना इफको टोकीयो विमा कंपणीने यवतमाळ जिल्हयातील फक्त ८ हजार शेतक-यांना पिकविमा मंजुर केला होता. कर्तव्यदक्ष खासदार भावनाताई गवळी(पाटील) यांनी तिव्र आंदोलन करुन तसेच थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या पर्यन्त पोहोचविला होता. त्यामुळे ६१ हजार २८९ शेतक-यांना ४७.१७ कोटी रुपयांचा पिकविमा मंजुर झाला. यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी शेतक-यांनी सुध्दा नियमाप्रमाणे तक्रारी करणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांना मदत मिळवून देण्यात अडचण जाणार नसल्याचे कर्तव्यदक्ष खासदार भावनाताई गवळी(पाटील) यांनी म्हटले आहे. चालू खरीप हंगामात आतापर्यंत तीन लाख २१ हजार ५२२ शेतकऱ्यांनी २३ कोटी १० लाख ५४ हजार ७५६ रुपये विमा हप्ता भरून तीन लाख ३२ हजार ५४७ हेक्टर शेतीक्षेत्राचा पिकविमा काढलेला आहे. यापैकी ७३१२ शेतकऱ्यांनी पिक नुकसान झाल्यामुळे पिक विमा मिळण्यासाठी तक्रार अर्ज सादर केले आहे. या नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतीचे पंचनामे करणे सुरु असल्याने उर्वरीत नुकसानग्रस्त शेतक-यांनी सुध्दा तातडीने अर्ज सादर करण्याचे आवाहन कर्तव्यदक्ष खासदार भावनाताई गवळी(पाटील) यांनी केले आहे.
नुकसान झाल्याची नोंद करा
पिकाचे संरक्षण व्हावे याकरीता मोठया प्रमाणात शेतकरी पिकविमा काढतात. मात्र नुकसान झाल्यानंतर तक्रारी करीत नसल्याचे दिसून आले आहे. अशावेळी पिकविमा कंपण्या नियमावर बोट ठेऊन पिकविमा नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतक-यांनी झालेल्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपणीच्या पोर्टल वर टाकाव्या किंवा कृषी विभागाकडे दोन प्रतित अर्ज सादर करुन रीसीव्ह कॉपी घ्यावी.
कर्तव्यदक्ष खासदार भावनाताई गवळी(पाटील)
यवतमाळ-वाशिम
