संकल्प फाउंडेशनचे मुख्य सल्लागार तसेच मा. सरपंच ग्रा. पं. रामपूर उज्वल भाऊ शेंडे यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमातुन साजरा

रामपूर येथील कुपोषित बालकांना कुपोषित धान्य किट चे वाटप

प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा

रामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नेहमी सामाजिक राजकीय कामातून चर्चेत असणारे नेहमी जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे संकल्प फाउंडेशन चे मुख्य सल्लागार तसेच रामपूर ग्रामपंचायत चे माजी सरपंच उज्वल भाऊ शेंडे याचा आज वाढदिवस सामाजिक उपक्रमातुन साजरा करण्यात आला रामपूर येथील कुपोषित मुलांना-मुलींना कुपोषित धान्य किट चे वाटप करण्यात आले तसेच स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम रामपूर येथे भोजनदान करून अनाथ बालकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी प्रामुख्याने उज्वल भाऊ शेंडे यांच्या सौभाग्यवती आरती ताई शेंडे, संकल्प फाउंडेशन संस्थापक सुरज गव्हाने, प्रकाश रोगे ओमप्रकाश काळे, शुभम मुणे, प्रफुल चोकारे तसेच सर्व जि. प.शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच इतर सर्व नागरिक उपस्थित होते