आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक लोने यांनी धमकी देऊन संगणक परिचालक गजानन पवार यांना काढले पदावरून?

गजानन पवार यांना आमरण उपोषणा पासून परावृत्त करण्यासाठी पदाचा गैर वापर करत

गजानन पवार यांचे डिसेंबर 2019 पासून चे सुमारे 19 महिन्याचे मानधन आणि नेट बिल साठी मिळत नसल्याने त्यांच्या सोबत अन्य संगणक परिचालक यांचे देखील मानधन थकीत असल्याने संगणक परिचालक संघटनेच्या वतीने नेट बिल येत्या 09/ऑगस्ट रोजी पर्यंत न मिळाल्यास आमरण उपोषम आणि काम बंद आंदोलनाचे पत्र पंचायत समिती कार्यालय किनवट येथे दि.03/ऑगस्ट रोजी देण्यात आले होते
ASSK oficial only नामक या संगणक परिचालक व्हाटस ऍप ग्रुप वरती
सदरील विषया बाबदची चर्चा संगणक परिचालक आणि आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक यांच्या सोबत सुरू असताना
जिल्हा व्यस्थापक लोने यांनी मानधन विषयी बोलत असलेल्या संगणक परिचालक यांना ग्रुप वरून एक -एकास काढन्यास सुरुवात केली
संगणक परिचालक यांना ग्रुप मधून काढण्याचे कारण गजानन पवार यांनी लोने यांना विचारले असता लोने यांनी अपशब्द वापरत गजानन पवार यांना किनवट येथे आल्यास परिणाम वाईट होण्याची भाषा वापरली आहे
आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक यांनी अधिकाराचा गैर वापर करत गजानन पवार यांना संगणक परिचालक पदावरून रात्री 11.50 वाजता काढून टाकले असून त्यांना आमरण उपोषणा पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला

प्रतिनिधी :- प्रशांत बदकी