भरधाव स्कॉरपिओ वाहनाने चिमुरडीला चिरडले

भरधाव स्कॉरपिओ वाहनाने चिमुरडीला चिरडले

दि. 4 ऑगस्टला 5 वाजताच्या सुमारास कु.‌ अवनी सुनिल खोबरे (वय 5 वर्ष)घाटकुळ हि रस्त्याच्या कडेला असलेल्या नळावर पाण्याचा पाईप धरुन असताना स्कार्पीओ वाहन क्र.MH 49 U 7683 या वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अवनी या मुलीला धडक मारुन जखमी केले. तिला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले असता तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अवनी च्या आईच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन पोंभुर्णा येथे गुन्हा नोंद करुन 279, 337, 304 (अ) भादवी 184 मोवाका अन्वय गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओल्लालवार करीत आहे.