रुग्णसेवा करत जपले “नाते आपुलकीचे” !! मंगलदीप लोहकरे आणि कवी खेमराज भोयर यांना प्रत्येकी दहा हजारांची मदत!

कोणत्या व्यक्तीवर कशी वेळ येईल हे कोणीच सांगू शकत नाही की परिस्थितीपुढे कोण माणूस लाचार होईल हे ही सांगता येत नाही,प्रसिद्ध कवी,लेखक श्री.खेमराज भोयर यांच्यावर अशीच वाईट वेळ आली,खेमराज भोयर हे प्रसिद्ध साहित्यिक आहेत,ते आरोग्यसेवक म्हणून नागपूरला कार्यरत आहेत,सगळं ठीक चालत असताना त्यांच्या पत्नीला एक तीन चार महिन्या अगोदर कोरोनाचे संक्रमण झाले,त्यांना वाचविण्यासाठी जवळचा पैसा,लोन उचलले आणि इतरांनी केलेली मदत असा जवळपास 6 लाखाचा खर्च त्यांनी केला,त्या कशातरी वाचल्या याच दरम्यान आत्ता 12 दिवसांअगोदर खेमराज यांना अस्थमाचा अटॅक आला आणि बेडवरून खाली पडल्याने एक हात सुद्धा फ्रॅक्चर झाला,ते गेल्या 10 दिवसांपासून आय सी यु मध्ये होते,हा ही खर्च न झेपणारा होता, शेवटी पैशाअभावी आहे त्याच स्थितीत त्यांना हॉस्पिटल सोडावे लागले,परिस्थितीसमोर माणूस लाचार होतो,त्यांनी फेसबुक,व्हाट्सएपच्या माध्यमातून मदतीसाठी विनंती केली,समाजातल्या स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या कंपूनी हात वर केले,काही मोजक्या लोकांनी थोडीफार मदत केली,खेमराज हे स्वाभिमानी व्यक्ती आहेत,तुम्ही केलेली मदत मी वाचल्यास नक्कीच परत करेन असे आपल्या पोष्टमध्ये लिहिले,त्यांच्या पोष्टवरून नाते आपुलकीचे संस्थेच्या सदस्यांमध्ये एकमत झाले आणि काही मदत करण्याचे ठरले तर वरोरा येथे राहणारा मंगलदिप मिलिंद लोहकरे हा मुलगा गेल्या दोन वर्षांपासून क्रोनिकल किडनी डिसिज ने ग्रस्त आहे असे नाते आपुलकीच्या काही सदस्यास माहीत झाले,दोन वर्षांपूर्वीच त्याच्या आईचा कॕन्सरमुळे स्वर्गवास झाला होता आणि लागूनच दोन वर्षांपासून मंगलदिपचा ट्रिटमेन्टचा खर्च सुरु आहे, यादरम्यान ट्रिटमेन्टसाठी घर सुद्धा विकावे लागले,सध्या घरी कोणीही कमविणारी व्यक्ती नाही,बहीण चंद्रपूरला असते, वडील गेल्या तीन वर्षांपासून घरीच असतात,पूर्वी ते MIDC मध्ये मजूरीवर जायचे पण परिस्थितीने त्यांचे कामही हिरावले, एक लहान भाऊ कसाबसा शिक्षण घेत आहे,सद्ध्या मंगलदीपला आठवड्यातून दोनदा डायलिसिसची गरज पडत आहे, किडनी ट्रान्सप्लांट शिवाय शक्य दुसरा ईलाज सध्यातरी नाही,डायलिसिस साठी त्याला आठवड्याला 10 ते 12 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो आहे आणि ही माहिती संस्थेच्या काही सदस्यांनी कार्यकरिणीला कळविली.
नाते आपुलकीचे संस्था गेल्या दोन वर्षांपासून समाजातील अनाथ,अपंग,गरजवंत आणि समाजात पात्रता असतानाही शिक्षण न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींवर आर्थिक स्वरूपात मदत करत आहे,एका व्हाट्सएप ग्रुपने उभी राहिलेली ही एकमेव संस्था असेल जी समाजातील तळागाळातील गरजवंतांना काही प्रमाणात मदतीचा हात देत आहे,संस्थेच्या कार्यावर संस्थेतील सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर भविष्यातही ही संस्था अविरतपणे सेवा करत राहील ही शास्वती आहे.
श्री.खेमराज भोयर आणि मंगलदीप लोहकरे याना समाजानेही स्वस्थ न बसता आपली थोडीफार का होईना मदत करावी अशी संस्थेतर्फे विनंती केली आहे,दोघानाही मदत करण्यासाठी संस्थेच्या पुढील संकेतस्थळावर मदत पाठवावी,ती मदत संस्थेतर्फे पोहचविण्यात येईल असे संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.