जिल्हा परिषद शाळा,धानोरा येथे सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, धानोरा येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिन कोरोना जागतिक महामारी चे नियम पाळून साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात येते परंतु शाळा व्यवस्थापन समिती ,धानोरा अध्यक्ष संजयभाऊ कारवटकर यांनी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान भारतीय सैन्य दलात लेह लद्दाख ( जम्मू काश्मीर) येथे देशाचे रक्षण करणारा धानोरा गावातील अनिकेत राजुभाऊ उराडे या सैनिकाची असते ध्वजारोहण करण्यात यावे असे ठरविले.आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण अनिकेत राजुभाऊ उराडे यांच्या हस्ते करण्यात आले सोबतच जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेच्या वतीने भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल अनिकेत राजुभाऊ उराडे आणि वृषभ किशोरभाऊ कामडी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयभाऊ करवटकर, उपाध्यक्ष जयाताई हारगोडे, सदस्य राजुजी डडमल, रुपराव कुंभलकर रमेशराव कुळसंगे,सुभाषराव जुनघरे शिक्षण प्रतिनिधी वाल्मीकराव मुडे सर, मुख्याध्यापक विजयराव दुर्गे, संदीपराव क्षिरसागर, शिक्षक वृंद व अनेक नागरिक उपस्थित होते.