महाराष्ट्र सैनिक स्व. सुनील इरावर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता किनवट (जि. नांदेड) येथील कट्टर महाराष्ट्र सैनिक स्व. सुनिल ईरावार यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता. किनवट च्या वतीने आज मोफत भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे किनवट येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्य उपाध्यक्ष मा राजुभाऊ उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानिक विधानसभा आमदार भिमरावजी केराम, श्री.कीर्तीकिरण पूजार (आय.ए. एस) यांच्या सह संबंधित सर्व वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी, आयोजक नितीन मोहरे(मा. तालुकाध्यक्ष) व जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…