विना परवानगी परप्रांतीय मजुरांना कामावर आणणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा:राहुल लोणारे शहराध्यक्ष मनसे


वरोरा शहराला लागून असलेल्या जी एम आर पॉवर प्लांट च्या कामासाठी झारखंड छत्तीसगड येथून जवळपास दीडशे हुन अधिक परप्रांतीय कामगारांना कोणतीही परवानगी न घेता वरोरा येथील मोहबाळा रोडवर असलेल्या बावणे मंगल कार्यालय येथे राहण्यासाठी आले आहे.,हे कामगार वरोरा शहरात रस्त्याने मोकाट फिरत असल्याने प्रशासन नाच्या उदासीनतेमुळे हा प्रकार वरोरा वासीयांच्या अंगलट येणार आहे
वरोरा येथील मोहबाळा येथे जीएमआर एनर्जी लि. कं. आहे, या कंपनीतून निघणाऱ्या 300 मेगावॅटच्या दोन चिमन्या असून या दोन्ही संचाद्वारे 600मेगावॅट विद्युत निर्माण केल्या जाते,सद्यस्थितीत हे दोन्ही संच बंद असून यांच्या दुरुस्ती चे काम करण्यासाठी परप्रांतातून150 वर कामगारांचा लोंढा जुनार्को ट्रेन द्वारे नागपुरात दाखल झाला ,बसने प्रवास करीत वरोरा शहरातुन मार्गक्रमण करीत बावणे मंगल कार्यालय गाठले ,कंपनी व्यवस्थापकाने तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, पोलीस विभागाला कोणतीही माहिती न देता या मंगल कार्यालयात ठिय्या मांडला, गावातील बाजारपेठ येथे पायदळ फिरत आहेत. अधिकारी या ठिकाणी कोणीच भटकले नाही या प्रकारामुळे बावणे मंगल कार्यालयाखालील दुकांनदारही दहशतीत आहे,एकशे पन्नास कामगार झारखंड छत्तीसगड राज्यातून परवानगी शिवाय शहरात दाखल होतातच कसे?या कामगारांना राज्याच्या सिमेवर कोणीच कसे विचारले नाही,48 तास आधीचे आर्टिपीसीआर टेस्टचा नमुना जवळ असणे आवश्यक असताना ती का करण्यात आली नाही,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे,मात्र एरवी सामान्य नागरिकांना नियम सांगणाऱ्या, प्रशासकीय अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे वरोरा नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे, मनसे वरोरा चे शहराध्यक्ष राहुल लोणारे यांनी व्यवस्थापणा विरोधात आवाज उचलत गुन्हा दाखल व्हावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.