नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकरी राजा सुखावला

प्रतिनिधी :- चेतन एस. चौधरी, नंदुरबार

गेल्या दोन महिन्या पासून दडी मारलेल्या पावसाने आज नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून रोज वातावरण ढगाळ आणायचे. परंतु पाऊस रिमझिम स्वरूपात तुरळक ठिकाणी पडायचा. शेतकरी राजा दुबार पेरणीमुळे आधीच संकटात होता. त्यात अजून जिल्ह्यातील जलस्तर खूपच खालावला होता. सर्वच प्रकल्पात पाणी जवळपास 30% पेक्षा कमी झाले होते. परंतु आज संध्याकाळ पासून पावसाला विजांच्या गडगडाटासह सुरुवात झाली. 1 तासात रस्त्यावर पाणीच पाणी झाले. हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार पुढील काही दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.