सहसंपादक : रामभाऊ भोयर
गांधी परिवारातील दोघांचा खून करण्यात आला पण गांधी परिवारातील राहुल गांधी व प्रियंका गांधी काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत माझा तर निवडणुकीत निसटता पराभव झाला त्यामुळे पराभवाने मी खचून जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसचे काम करत राहणार असा विश्वास प्राध्यापक वसंत पुरके यांनी काँग्रेसच्या आभार सभेत व्यक्त केला काँग्रेसच्या वतीने आभार सभेचे आयोजन राळेगाव येथे करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री पुरके बोलत होते मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रफुल्ल मानकर काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर खरेदी-विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी अशोकराव केवटे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुने शिवसेना उभाटाचे तालुकाध्यक्ष विनोद काकडे नगराध्यक्ष रवींद्र शेराम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रकाश खुडसंगे प्रवीण कोकाटे बाळासाहेब जवादे इमरान कुरेशी आधी उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रफुल्ल मानकर यांनी आपले विचार मांडले तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापले विचार यावेळेस मांडले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री पुरके पुढे म्हणाले की आपल्याला यापुढे शाश्वत विचारांना जपायचं आहे सोबतच पक्षातील लिकेजेस दुरुस्त करावे लागेल पक्षाच्या सर्व विंग्स मजबूत कराव्या लागेल माझे आदर्श शरद पवार अब्राहम लिंकन आहेत ते कधी पराभवाने खचले नाही मी सुद्धा खचणार नाही तीन वेळा पराभव झाला पण यापुढेही मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी लढत राहणार आहे कारण माझे रक्त हे काँग्रेसचे आहे कार्यकर्त्यांच्या निवडणुका मी यापुढेही तन-मन-धनाने लढणार आहोत भविष्यातील निवडणुका जिंकायच्या असल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक असावे यापुढे आपल्याला ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा द्यायचा आहे ई ईव्हीएम विरुद्ध जनजागृती करायचे आहे मी जराही उमेद हारलेलो नाही कधी न कधी आपल्या विजयाचा सूर्य उगवणार आहे या आभार सभेचे संचालन राजेंद्र नागतुरे यांनी तर आभार प्रदर्शन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी केले