ग्रीन गोल्ड सीड्स छ. संभाजीनगर तर्फे कापूस कार्तिक 99 पिक पाहणी राळेगाव येथे संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्रातील अग्रगण्य बियाणे उत्पादक कंपनी ग्रीन गोल्ड सीड्स छ. संभाजीनगर तर्फे राळेगाव येथील शेतकरी श्री. सचिनसिंह चौहान यांच्या आष्टा रोडवरील शेतावर संकरित कापूस वाण कार्तिक 99 या वाणाची शेतकरी पिक पाहणी यशस्वीरीत्या संपन्न झाली. या कार्यक्रमात राळेगाव परिसरातील 280 शेतकरी सहभागी झाले होते आणि त्यांनी कार्तिक 99 वाणाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रीन गोल्ड सीड्स चे विदर्भ असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. अभिजित चांगोले यांनी शेतकऱ्यांना कापूस कार्तिक 99 सोबतच सोयाबीन वाण गोल्ड 3344 तसेच रब्बी हंगामासाठी गहू गोल्ड 23 आणि हरभरा गोल्ड 75 याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना या वाणांची लागवड करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यवतमाळचे रिजनल मॅनेजर श्री. नरेंद्र तांबाखे यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख शेतकरी सचिनसिंह चौहान. अतुल चाफले,गजानन निमट, दशरथ येनोरकार आणि अन्य शेतकरी उपस्थित होते. याशिवाय बियाणे व्यावसायिक कमल भाऊ बागडी, सतीश कांडूरवार, कौस्तुभ शिर्के,उदय टोने,प्रवीण कटारिया विनोद मुथा, संजय बोथरा, संजय कांडूरवार आणि गणेश कुटे हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे अधिकारी सुमितसिंह पवार, आकाश निचित, लक्ष्मण राठोड, सागर मोरे,चंद्रकांत कोसुरकर, रोशन राजपूत आणि अविनाश तिखट यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या पिक पाहणी कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार फिरोजभाऊ लाखनी, मनोहर बोभाटे, गुड्डू मेहता, राजेश काळे, महेश भोयर, प्रवीण गिरी आणि मंगेश राऊत यांनी देखील सहभाग घेतला.