
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
–प्रतिनिधी-मध्य प्रदेशमधून पुसद तालुक्यातील एका ठिकाणी खेडेगावात मुलगी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनाला खंडाळा घाटात भीषण अपघात होऊन त्यात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अतिशय मनाला हेलावून टाकणारी घटना घडली असून मयत मध्ये अशोक खोंदरे वय ४५ रा.अंबासेल जिल्हा हरदा मध्य प्रदेश ,अनंत पाटील वय ४५ रा. कालधड जिल्हा खंडवा मध्यप्रदेश ,अरविंद बाडे वय २५ रा.मिसालिया जिल्हा खंडवा मध्यप्रदेश हे घटनास्थळीच मयत झाले तर गंभीर जखमीमध्ये रामशंकर निर्भयादास खादे वय ५० रा.कालकोंड जिल्हा हरदा ,शेरसिंग राजपूत वय ३० रा.भवान्या जिल्हा खंडवा या जखमींवर येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून या भीषण अपघात घडल्यानंतर त्या मार्गाने येत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता शिलानंद कांबळे यांनी घटना बघून ताबडतोब एक शे आठ व पाेलिस विभागांना कल्पना दिली ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार बोडखे तथा खंडाळा पोलीस स्टेशन चे ठाणेदार नीलेश गोपालचावडीकर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी शेख मकसूद तथा सहायक पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमींना उपचारार्थ दाखल केले मयत झालेल्या पोस्टमार्टम करता शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अतिशय मनाला चटका लावून जाणारी घटना घडल्याने तालुक्यात एकच हाहाकार उडाला आहे मध्य प्रदेशमधून मुलगी बघायला आलेल्या या लोकांवर ऐन खंडाळा घाटात काळाने घाला घातला अतिशय दुर्दैवी घटना घडली अधिक तपास पोलीस करीत आहेत .
