
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वर्धा जिल्ह्यातील कारंजा व आष्टी तालुक्यातील पिकांवर आलेल्या रोगांमुळे कर्तव्यदक्ष माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे यांनी पिक पहाणी दौरा केला.त्यावेळी सोयाबीन पिकावर यलो मोजक व मोसंबीवर डिंक्या रोगाने कहर केला.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.कारंजा व आष्टी तालुक्यातील कर्तव्यदक्ष माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सोयाबीन,संत्रा,मोसंबी पिकांची पहाणी केली व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेवून विदर्भातील शेतकऱ्यांवर आलेले संकट व विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगणार आहे.
त्यावेळी सोयाबीन उतपादक शेतकरी रमेशराव नासरे,दिवाकरराव खोडे,कल्पनाताई नासरे इत्यादी शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.त्यावेळी सोबत तारासावंगी येथील पोलीस पाटील अजयजी कडु,आष्टी पंचायत समितीचे उपासभापती गोविंदराव खंडाळे,रा.कॉंचे आर्वी विधानसभा अध्यक्ष गोपाळजी मरस्कोल्हे ,अनंतराव झाडे,अनिलराव मुल्ला,सुनीलजी इंगळे,आर्वी रा.यु. काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष वृषभजी निस्ताने,अरुणजी चाफले,मोहनजी किनकर इत्यादी उपस्थित होते.
