वडकी ते पिंपळापूर रोडवरती असलेल्या नाल्याला पूर ग्रामस्थांचा सम्पर्क तुटला

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

आज दि 7 सप्टेंबर रोजी वडकी ते पिंपळापूर रोडवरती लागून असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला,सदर पिंपळापूर रोडवर असलेल्या या नाल्याची उंची फार कमी प्रमाणात असल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला की या नाल्याला पूर येतो,त्यामुळे पूर आल्याने वडगाव पिंपळापूर वडकी येजा करणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटतो आज दि 7 सप्टेंबर रोजी सकाळपासून पाऊस सुरू असल्याने या रोडवरती सुमारे एक ते दोन वाहतूक खोळंबली होती व रोड पार करत असताना एक मोटरसायकल स्वार या पुराचा पाण्यात पडला मात्र जीवितहानी टळली सदर या नाल्याची उंची वाढविण्याची मागणी पिंपळापूर वासीयांची केली आहे,