शिक्षक अभावी बोथ येथील शालेय विकास ढासाळला संतप्त नागरिकांनी दिला शाळेला कुलूप लावण्याचइशारा


अधिकाऱ्यांचे दूर्लक्ष

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली का असा प्रश्न जनतेतून व्यक्त केला जात आहे
बोथ ( उमरी बाजार )गाव पेसा योजनेत समाविष्ट असून येथील जिल्हा परिषद शाळेला रुजू असलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक जवळली खंबाळा येथे शाळेवर जुलै 2022 ला देण्यात आले होते
बोथ येथील शाळेवरील दोन शिक्षकांन पैकी एकच शिक्षक शाळेवर रुजू असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचे पालकांच्या लक्षात येताच पालकांनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती किनवट यांच्या कडे तक्रार केली पण सादरील तक्रारीवर मौन धारण करत अधिकारी यांच्या कडून कोणत्याही प्रकारे दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही.
विशेष म्हणजे तक्रारी अर्जात शाळेला कुलूप लावन्या बाबद इशारा देखील दिला आहे.
अधिकारी यांची इच्छा शाळा बंद करण्याचीच आहे का अशी प्रतिक्रिया
सदरील तक्रार लक्षात घेवून नागरिकान कडून ऐकवायास मिळत आहे
.