स्वातंत्र्यसैनिक कै. पी.के.अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १८ सप्टेंबर रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण …

प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी

शहादा : स्वातंत्र्यसैनिक कै. पी.के.अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १८ सप्टेंबर रोजी विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील असतील. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी, खासदार सुरेंद्रसिंह नागर, आमदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, खासदार रक्षा खडसे, खासदार डॅा.हिना गावित, डॅा.विजयकुमार गावित,आमदार राजेश पाडवी, काशिराम पावरा, शिरीष नाईक, सुधीर तांबे, सुनील भुसार, संगीताबेन पाटील, माजी आमदार अमरिशभाई पटेल, चंद्रकांत रघुवंशी, शिरिष चौधरी, राजवर्धन कदमबांडे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित राहणार असल्याची माहिती पी.के.अण्णा फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली.