कापसाचे दर आठ हजाराखाली,शेतकरी चिंतेत

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

अनेक दिवसापासून कापसाच्या दर हे 8000 किंवा त्याच्यावरती होते पण आज पहिल्यांदाच कापसाचे दर हे 8000 रुपयाखाली आले त्यामुळे शेतकऱ्यांचे धाकधुकं वाढली असून शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे।।। यावर्षी सुरुवातीपासून कापसाच्या भावामध्ये अनिश्चितता दिसून येत आहे तरी सुरुवातीला कापूस साडेआठ ते नऊ हजार रुपये दरम्यान होता पण गेल्या काही दिवसापासून कापसाचे भाव हे 8000 रुपयाभोवती फिरत आहेत हंगाम सुरू झाल्यावर कापसाचे भावबाबत शेतकऱ्यांमध्ये आशादाय चित्र होते पण जसं जसं हंगाम समोर गेला तसतसे आशादायक चित्र धूसर होऊ लागले आणि आता तर कापसाचे भाव हे आठ हजार रुपयेचेही खाली आले आहे कापसाचे दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी मात्र आपला कापूस घरातच ठेवत आहे गेल्या वर्षी कापूस तेरा हजार रुपयेच्याही पुढे गेला होता त्यामुळे शेतकऱ्याला यावर्षी किमान दहा हजार रुपये भावाची अपेक्षा होती पण ती अपेक्षा या वर्षी पूर्ण होताना दिसत नाही कारण कापसाचे भाव हे दिवसेंदिवस कमी होत आहे शासनाने कापसाचे केलेली आयात किंवा इतरही बाबींमुळे कापसाच्या दरामध्ये वाढ होत नसल्याचे जाणकार सांगतात शिवाय कापसाचे भाव हे दिवसेंदिवस पडत असल्याने कापसाच्या भावबाबत शेतकरी कोर्टात सुद्धा दाद मागत आहे तरी कापसाचे भाव वाढण्यास तयार नाही कापसाचे भाव वाढीबाबत अनुकूल चित्र असताना कापसाचे भाव आठ हजार रुपये खाली का आले या प्रश्नाने शेतकऱ्यांचे मत व्यथित होत आहे माशी कुठे शिंकेली याचा शोध शेतकरी घेत आहेत काय केल्याने भाव वाढेल याचाही प्रयत्न शेतकऱ्याचा सुरू आहे दिवसेंदिवस कापसाचे भाव कमी होत असताना शेतकऱ्यांना आशेचा जो एक किरण आहे तो म्हणजे वायदे बाजार 13 तारखेपासून कापसाचा वायदे बाजार सुरू होत आहे आधी कापसाला वायदे बाजार मधून वगळण्यात आले होते पण पुन्हा आता कापसाचा समावेश वायदे बाजारात केल्याने कापसाचे भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे शेतकऱ्यांची आशा कितपत पूर्ण होते की पुन्हा शेतकऱ्यांना पदरी निराशाच येते हे 13 तारखेनंतर दिसून येईल पण तूर्तास भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका मात्र दिवसागणिक चुकत आहे एवढे निश्चित.