कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन हिंगणघाट कडून आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते मोहता मिल कामगारांच्या पाल्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप

हिंगणघाट ….
दिनांक २० सप्टेंबर

गेल्या अनेक दिवसापासून हिंगणघाट येथील स्थानिक आर एस आर. मोहता मिल बंद पडल्यामुळे येथील मोहता मिल कामगारांची आर्थिक स्तिथी बिकट झालेली आहे. या कामगारांची आपल्या पाल्याची वर्ग 11वी आणि 12वी ची शिकवणी शुल्क भरण्याची व्यवस्था नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. अशावेळी ही समस्या त्यांनी आमदारांच्या पुढे मांडली, मा.आमदार समीर कुणावर यांनी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन हिंगणघाट च्या शिक्षकांना या मुलांना निशुल्क कोचिंग देण्याचे आव्हान केले आणि कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन च्या शिक्षकांनी ही जबाबदारी स्वीकारत या पाल्यांच्या शिक्षणा साठी मदतीचा हात दिला, यात जवळपास 30 ते 35 पाल्याना मोफत शिकवणी दिली जाणार आहे. यासाठी आमदारांच्या निवास्थानी सर्व कामगार पालक, विद्यार्थी आणि खाजगी कोचिंग क्लासेस शिक्षक याची संयुक्त सभा घेण्यात आली होती.
या सर्व मोहता मिल कामगारांच्या पाल्याना मा.कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन हिंगणघाट तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी खाजगी क्लास संचालकांचे हे कार्य फार मोठे आहे म्हणत आमदारांनी त्याचे आभार व्यक्त केले आणि भविष्यात सर्व क्लास संचालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा माहाराष्ट्र प्रदेश सचिव, नगरसेवक श्री अंकुश ठाकूर, सीसीटीफम चे राज्य कार्याध्यक्ष श्री सुनील पिंपळकर, हिंगणघाट तालुका अध्यक्ष श्री राजू चौधरी, पंकज भोंगाडे, गणेश मुंगले, प्रमोद कुंभारे, प्रशांत भेदूरकर, अरुण घोटेकार, सतीश कावळे, महेंद्र बन्सोड, रितेश पोफळे, शशिकांत डुंबरे, स्वप्नील बारहाते, प्रवीण मुजबैले, महेंद्र कासवा, रुपेश हिवरकर, निखिल जोगे, प्रफुल मेश्राम, संजय भगत, मनोज सायंकार, सुशांत बारहाते, अनिल जैन, संदेश बारहाते, अनिल झाडे सौ.रेणुका दवंडे, सौ.सोनाली मुजबैले, निलेश बर्डे, इमरान शेख, स्वप्नील बाहुरे, धनंजय साळवे,भारत येळणे, चेतन भिसेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरुण घोटेकार यांनी केले तर पंकज भोंगाडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या साठी ईतर सर्व खाजगी कोचिंग क्लास संचालकाचे सहकार्य लाभले.