
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक : 23/12/2021 जि. प. उच्च प्राथमिक शाळा येरळा येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापना सभा मा. श्री. ओमदेवजी नि. बोधे (अध्यक्ष) शाळा. व्य. समिती येरला यांच्या अध्यक्षतेखाली समा संपन्न झाली. सभेला सर्व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. त्यामुळे सदस्य निवड प्रक्रीया राबविण्यात आली. मा. श्री. विजय कुंभारे मुख्याध्यापक शेरला यांनी सर्वप्रथम उपस्थित पालकांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. व निवड प्रक्रिया कशी राबवायची याबाबत सविस्तर माहीती पालकांना देण्यात आली. व सर्व घटकांचे सदस्य निवडायचे असुन कीती सदस्य निवडायचे ते सांगितले.
पालक समेतून श्री. जयंतराव भ. कातरकर, पालक श्री. अमोलराव सु. तेलंगे, श्री अनिलराव वा खंडाळकर, श्री. शंकरराव वा. भोकरे, श्रीमती शुभांगीताई नगराळे, सौ. प्रणितालाई वि. आड़े, सौ. सुनिताताई प्र. उमाटे, सौ. मंगलाताई स. जोगी, सौ. सीमाताई ग. टापरे या सर्व सदस्यांची बहुमतांनी निवड करण्यात आली. वरील सदस्यांपैकी श्री. जयंतराव कातरकर यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून व श्री. अनिलराव बा खंडाळकर यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. निवड प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय कुंभारे व सर्व शिक्षकांनी पार पाडली. सभेला • मा. सौ. अस्मिताताई क. पंधरे सरपंच या पालक म्हणून सभेला उपस्थित होत्या.
