
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव भाजपा महिला आघाडीने वडकी येथे सेवा सप्ताह कार्यक्रमात पंतप्रधानांनी काढलेल्या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांनी भारताच्या पंतप्रधानांना पोस्टकार्ड मार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे खूप खूप आभार मानले भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौ मायाताई शेरे यांनी वडकी या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून उपस्थित महिलांना पंतप्रधान आवास योजना उज्वला गॅस योजना स्वच्छ भारत शौचालय योजना आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान पिक विमा योजना या योजनेचे महिला लाभार्थी यांना या योजनेमधून लाभ झालेला आहे म्हणून त्यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित केले,ह्यावेळी काही लाभार्थी महिला यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या साठी व आमच्या मुलीसाठी सुद्धा बर्याच अश्या आयोजनाचा लाभ आम्हाला झालेला आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करते व आमच्या शुभेच्छा मोदीजीँना पोचवा पोस्टकार्ड त्यांनी शुभेच्छा लिहून दिल्या त्यावेळेस भरपूर महिलांचा समावेश होता,या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रेखाताई कोठेकर जिल्हा मंत्री वैशालीताई खोंड जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई काकडे सचिव मीनल पांडे,चिटणीस रेखाताई नंदुरकर,महिला तालुका अध्यक्ष विद्याताई लाड,तालुका सचिव संतोषिताई वर्मा,शालिनीताई तोडासे, वंदनाताई कुठे,गीताताई पढाल,भारतीय जनता पार्टीचे गजाननराव लढी,बाळासाहेबजी दीघडे,श्रीरंगजी चाफले,विशालभाऊ पंढरपुरे,किशोरभाऊ गारघाटे, रणजितजी ठाकरे,पारसजी वर्मा,मोहनराव लाड,उपस्थित होते,या कार्यक्रमाचे संचालन शिलाताई जंगीलवार यांनी केले,ह्यावेळी कार्यक्रमाला अनेक लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
