मानकी ग्राम पंचायत कार्यालयात म. गांधी जयंती साजरी

  • Post author:
  • Post category:वणी

वणी तालुक्यातील मानकी येथे ग्रामपंचायत कार्यालयात जगाला अहिंसा, सत्य आणी सहिष्णुता यांची शिकव देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच व ग्रा.पं.सदस्य,पोलीस पाटील,तंटामुक्त समिती अध्यक्ष व कर्मचारी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तेलचित्राला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच कैलास पिपराडे, पोलीस पाटील सौ.मिलमिले, तंटामुक्तीचे अध्यक्ष परशुराम पोटे, ग्रा.पं.सदस्य नानाजी पारखी,सुनिल कुत्तरमारे, सौ. इंदिरा पोटे, नलिनी मिलमीले, सुनिता कुत्तरमारे, डाटा आपरेटर प्रदिप मालेकर,ग्रा.पं.कर्मचारी प्रेमदास राजगडकर, अमर खुसपुरे ईत्यादी उपस्थित होते.