
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य प्रत्येक शेतकरी खातेदाराला त्याचा सातबारा डिजिटल स्वाक्षरी ने मिळणार असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्तया या मोहिमेची सुरुवात झाली आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा डिजिटल सातबारा घरी उपलब्ध होणार आहे महसूल विभागावर ही जबाबदारी असून महसूल कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा शेतकऱ्यांच्या घरी पोहोचणार आहे त्यात त्रुटी आढळल्यास शेतकऱ्यांचा अभिप्राय मागविण्यात येणार आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या सातबारावरील काही त्रुटी असल्यास दुरुस्ती करणार आहे याची सुरुवात राळेगाव येथे निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांच्या मार्गदर्शनात झाली असून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी चा भुमी अभिलेख देण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या सातबाराचे अवलोकन केले याप्रसंगी मंडळ अधिकारी विश्वास वाघ. तलाठी मोहन सरतापे. सौरभ तुमस्कर यांची उपस्थिती होती.संगणकीकृत डिजिटल भुमिअभिलेख यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा मिळेल त्यातील त्रुटीदुरुस्त करण्याच्या संधी मिळणार आहे शासनाचे ही मोहीम शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे.दिलीप बदकी निवासी नायब तहसीलदार
