राळेगाव येथे बोगस बियाण्यावर धाड दोन युवक अटक,बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी


राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)


जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त कारवाई मध्ये राळेगांव येथे बोगस बियाणे पकडण्यात आले. मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज सकाळी नऊ वाजता दोन आरोपींवर विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राळेगांव शहरात व तालुक्यात कपाशी चे बोगस बी.टी.वाणं विकणं हे सुरु होते. कृषी विभाग पातळीवर व दक्ष असल्याने अनेक शेतकरी यातून बचावले आहे हे विशेष.याची किंमत खूप मोठी असल्याचे कळते.  

 यावेळी कृषी विभागाचे वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृषी विभागाचे राजेंद्र माळोदे,पंकज बरडे,रोशन गुलाले सह जिल्हा गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त धाडीमुळे अवैध बियाणे विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे हे विशेष.