ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्या :- सुनील पतंगे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी


हिमायतनगर तालुक्यात दि.25,26,27,28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस, तूर यासह इतर खरीब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे तालुक्यातील नदी नाले ओढे भरून वाहील्याने अनेक शेतकऱ्याच्या पिकासह जमिनी खरडून गेल्या आहेत त्यामुळें महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे हिमायतनगर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील पतंगे यांनी आज दि 4 ऑक्टोबर रोजी तहसिलदार यांना एक लेखी निवेदन देऊन केली आहे

   

यावर्षी झालेल्या अतिवृष्टमुळे व गुलाब चक्री वादळाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि ईसापूर धरणातून जास्तीचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या व त्यांच्या शेतातील विद्युत मोटार,केबल, पि. व्ही.सी. पाईप सह आदी शेतीचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत देऊन हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील पतंगे यांनी केली आहे यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनील पतंगे,युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, उदय देशपांडे, दत्तलाल जैस्वाल, आकाश सूर्यवंशी, अशितोष बोरेवाड, प्रशांत सूर्यवंशी, पळसपुरचे सरपंच मारोती वाडेकर, दाऊ गाडगेवाड, गोविंद शिरफुले, एकनाथ पाटील, बालाजी म्याकलावड, लालू टेकेवड, मुबिण कुरेशी,शेख समीर, अब्दुला खान, मुन्ना जे. के. सह आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते